सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका; दोन लिपिकांना केले निलंबित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 19, 2026

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका; दोन लिपिकांना केले निलंबित

 सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका; दोन लिपिकांना केले निलंबित



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, बायोमेट्रिक हजेरी लावून कार्यालयातून निघून जाणे, बैठकीत दिलेल्या सूचने प्रमाणे काम न केल्याबद्दल सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मालमत्ता कर विभागातील दोन लिपिकांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

महापालिका आयुक्तांच्या सहीने 17 जून रोजी हे आदेश काढण्यात आले आहेत.आप्पाराव गुंडप्पा गोरे सिव्हिल लाईन पेठ व जब्बार अ रहिमान नदाफ पेठ क्रमांक 67 मजरेवाडी असे निलंबित केलेल्या दोन कनिष्ठ श्रेणी लिपीकांची नावे आहेत. हे दोघे ही मालमत्ता कर विभागाकडे कनिष्ठ श्रेणी लिपीक या पदी कार्यरत आहेत.मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक दिनांक २८/०५/२०२६ रोजी घेण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सर्व संबंधितांना मिळकतदारांची e-KYC पूर्ण करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पेठनिहाय यादी देऊन कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलेले आहे. तसेच जा.क्र. उ.आ./वै./०३ दि.०८/०४/२०२६ व दि.०७/०५/२०२६ अन्वये मालमत्ता कर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन मिळकतींचा शोध घेणे, अपार्टमेंटमधील शिल्लक फ्लॅट/गाळ्यांची आकारणी करणे व दररोज किमान ०५ मिळकतींची आकारणी पूर्ण करणे याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.ज्याअर्थी आप्पाराव गुंडप्पा गोरे आणि जब्बार अ रहिमान नदाफ कनिष्ठ श्रेणी लिपिक यांनी वरिष्ठांच्या आदेशांचे पालन केलेले नाही. वेळोवेळी समज देऊन व सूचना देऊनही त्यांच्या कामकाजामध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. त्यांच्याकडून निर्धारित उद्दिष्टांची पूर्तता होत नसून, कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून प्रत्यक्ष क्षेत्रीय काम न करता कार्यालयातून निघून जाणे, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणे व शासकीय कामकाजात निष्काळजीपणा करणे अशा बाबी निदर्शनास आलेल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages