पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी प्रवीण तनपुरे यांची निवड
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवीण उत्तेश्वर तनपुरे यांची निवड झाली आहे.या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून मन:पूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. सामान्य कुटुंबातील प्रविण तनपुरे जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर सन २०१४ पोलिस भरती झाला. नवी मुंबई येथे क्राईम ब्रांचला पदावर काम असताना मेहनत घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक (PSI) निवड झाली आहे.त्याचा यशस्वी वाटचालीस शुभेच्छाचा वर्षांव होत आहे.

No comments:
Post a Comment