निलेश संगेपाग यांची 'सोलापूर शहर अध्यक्ष' पदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2026

निलेश संगेपाग यांची 'सोलापूर शहर अध्यक्ष' पदी निवड

 निलेश संगेपाग यांची 'सोलापूर शहर अध्यक्ष' पदी निवड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सोलापूर ते दिल्ली असा सायकल प्रवास करून तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणारे धडाडीचे युवा नेते निलेश संगेपाग यांची पक्षाच्या 'सोलापूर शहर अध्यक्ष' पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहरातील युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निलेश संगेपाग हे पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विविध पदांवर काम करताना त्यांनी पक्षवाढीसाठी रात्रंदिवस कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या प्रामाणिक कार्याची आणि निष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर आता सोलापूर शहराध्यक्षपदाची अत्यंत महत्त्वाची धुरा सोपवली आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांच्यावर टाकण्यात आलेला हा विश्वास त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.

"पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन!"
या निवडीबद्दल बोलताना निलेश संगेपाग म्हणाले की, "माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे. पक्षाने माझ्यावर जो मोठा विश्वास दाखवला आहे, तो मी प्रामाणिकपणे सार्थ ठरवेन. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सोलापूर शहरात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी यापुढेही आणखी नव्या जोमाने काम करत राहीन."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages