आयसीटी योजनेतून वाशिंबेच्या आदर्श जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 1, 2026

आयसीटी योजनेतून वाशिंबेच्या आदर्श जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब

 आयसीटी योजनेतून वाशिंबेच्या आदर्श जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब





वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे.

या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक समजण्यास सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, दृकश्राव्य माध्यमे, अँनिमेशन आणि ध्वनी प्रभावांचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनत आहे.

शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्याथ्यर्थ्यांना डिजिटल माध्यमातून ज्ञान मिळत असल्याने त्यांची बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शाळामध्ये निवड झाल्याने शाळेची सुसज्ज इमारती, वाचनालय, शैचालय, भौगोलिक निसर्गरम्य सुंदर मैदान अशाने विद्यार्थीची संख्या वाढत आहे.

मुख्याध्यापक शरद झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणबरोबरच कलांगुणांच्या विकासासाठी नृत्य, क्रीडा, व्याख्याने होत आहेत.

काळानुसार आवश्यक बदल

शासनाकडून आयसीटी लॅब तसेच इतर भौतिक सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या युगात येथील विद्यार्थी स्पर्धेत टिकून राहावेत यासाठी काळानुसार बदल स्वीकारत मराठी माध्यमाबरोबरच सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमही राबवण्यात आला आहे. 
- शरद साळुंके, मुख्याध्यापक, वाशिंबे

सर्व सुविधांनी सज्ज प्रयोगशाळा

केंद्र व विज्ञान प्रयोग शाळा, कार्यानुभव प्रयोगशाळा, खेळाचे मैदान, डिजिटल बोर्ड, संगणक लॅब, कॉन्फरन्स हॉल, विजेसाठी सौर ऊर्जा प्रणाली, सीसीटीव्ही, अशा सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages