प्रा. सुनीलकुमार गोरखनाथ पाटील यांची मानद डॉक्टरेट (Ph D) पदवीसाठी निवड
सातारा (कटूसत्य वृत्त):- अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण ( Engineering and Technology) क्षेत्रात गेली चार दशके उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनीलकुमार गोरखनाथ पाटील यांना ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौन्सिल तर्फे मानद डॉक्टरेट (Ph D) पदवी साठी निवड करण्यात आली आहे. सदर पदवी अंबोली सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील दीक्षांत समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे .
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे दीर्घ कालीन योगदान , तांत्रिक शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न तसेच विद्यार्थ्या मध्ये वैधानिक दृष्टी कोण विकसित करण्यासाठी घेतलेले उपक्रम यांचा आमच्या शैक्षणिक आणि सल्लागार समितीने काळजीपूर्वक पुनरावलोकन आणि शिफारस केल्या नंतर एकमताने ठरविण्यात आले की तुमच्या कामगिरी आणि प्रभावामुळे तुम्ही या मानद सन्मानासाठी अत्यंत पात्र आहात त्याचा गौरव म्हणून हा सन्मान देण्यात आला .
प्रा. पाटील यांनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण अधिक परिणामकारक आणि व्यवहारिक करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे , कौशल्य आधारित शिक्षणाला प्रोचाहन देणे आणि तरुणांना संशोधन व नवं नवीन उपक्रमासाठी प्रेरित करणे या क्षेत्रात त्यांनी महत्त्व पूर्ण कार्य केले आहे
त्यांच्या नेतृत्वाखाली पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्युट ने अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली असून अनेक विद्यार्थी विविध औद्योगिक क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे
ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल कडून प्रदान करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी ही प्रा. पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेणारी प्रतिष्ठित गौरव चिन्ह आहे. या सन्मानामुळे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळेल.
सदर डॉक्टरेट (पदवी Ph D) निवडीचे पत्र ऑलिम्पियाड एग्जामिनेशन कौंसिल विद्यापीठाचे vice - chancellor डॉ .आचार्य जगदीश यानी सातारा येथे संस्थेमध्ये दिले. सदर प्रसंगी तुमच्या सारख्या व्यक्तीशी संबंध असणे हा आमचा सन्मान आहे.तुमच्या या सन्मानाच्या उदार स्वीकृतीबद्दल आम्ही उत्सुक आहोत ऑलिम्पियाड परीक्षा परिषदेशी असलेले तुमचे संबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विद्यार्थी , व्यावसायिक आणि संस्थांना प्रेरणा देत राहतील असे मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी संचालिका सौ संगीता पाटील , प्राचार्य सुजित पाटील , कु स्नेहल पाटील , सौ रेवती पाटील , शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर पदवी दान समारंभ 25 मे 2026 रोजी आयोजित केला आहे.

No comments:
Post a Comment