मोहोळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हराळवाडीत एका रात्रीत सहा घरफोड्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

मोहोळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हराळवाडीत एका रात्रीत सहा घरफोड्या

 मोहोळ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; हराळवाडीत एका रात्रीत सहा घरफोड्या


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हराळवाडी गावात एका रात्रीत सहा घरफोड्या केल्या आहेत.अंधाराचा आणि उन्हाळ्या असल्याने उकाडयामुळे नागरिक बाहेर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.या घरफोड्यांमध्ये जवळपास १० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांच्या निशाण्यावर आले.गावातील नागरिक उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपले असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत एकामागून एक तब्बल सहा घरे फोडली.

चोरट्यांनी घरातील कपाटे आणि लॉकर फोडून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला.प्राथमिक माहितीनुसार जवळपास ६ तोळे सोन्यासह सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.

सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा सुरू करत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.एका रात्रीत सलग सहा घरफोड्या झाल्याने हराळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages