सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

 सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-  सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. २५ मे २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजता लागू झाला असून तो दि. ८ जून २०२६ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.  
या आदेशानुसार शस्त्रे, अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, चाकू, लाठ्या, स्फोटके, क्षेपणास्त्रे, उपरोधिक पदार्थ तसेच सार्वजनिक ठिकाणी टिकाकरण, उत्तेजक गाणी, संगीत वाजवणे, अश्लील चित्रे किंवा चिन्हे प्रदर्शित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून जप्त केलेली शस्त्रे व वस्तू राज्य सरकारकडे जमा करण्यात येतील.  
तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींच्या संमेलनास, मिरवणुकीस, लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड व फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, कायदेशीर सभा, शैक्षणिक उपक्रम, कारखाने, दुकाने, चित्रपटगृहे, नाटकगृहे, सरकारी कार्ये व परवानगी दिलेल्या संमेलनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.  
हा आदेश सोलापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, न्यायालये व सरकारी कार्यालयांमध्ये चिकटवून तसेच लाऊडस्पीकर, मेगाफोन व प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages