खा. मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अकलूज (कटूसत्य वृत्त):- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY-IV) अंतर्गत २०२६-२७ च्या पहिल्या टप्प्यात ७.६९ कोटी रुपये खर्चाच्या सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी दिली आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास व कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबतचे पत्र खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठवून मंजुरीची माहिती दिली आहे.
मंजूर कामे पुढील प्रमाणे आहेत.
शेरीमळा ते एसएच-386 (एकतपूर) – 1.60 कि.मी. – ₹177.95 लाख,
कोळवले वस्ती ते अजनाळे – 1.43 कि.मी. – ₹164.28 लाख,
कोळसेवस्ती ते व्हीआर-46 (हंगीरगे) – 1.30 कि.मी. – ₹168.23 लाख,
देशमुख-किसन साळगरे पाटीलवस्ती-गुंडीवस्ती ते व्हीआर-131 (कोळे) – 1.80 कि.मी. – ₹259.03 लाख,
एकूण रस्ते लांबी : 6.13 कि.मी.
मंजूर निधी : ₹7.69 कोटी,
या रस्ते कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि शेतीमाल वाहतुकीस मोठी चालना मिळणार असून ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे माढा मतदारसंघातील विकासकामांना मिळत असलेल्या गतीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
.png)
No comments:
Post a Comment