सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2026

सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार

 सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार - सभापती चेतनसिंह केदार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद, आणखी दीड कोटींची मागणी करणार आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती  चेतनसिंह केदार यांनी दिली. 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आरोग्य समिती सभा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार - सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी समितीच्या सदस्या  सोनाली कडते, संगिता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.

या सभेमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी पारदर्शक पध्दतीने आरोग्य विभागाचा कारभार झाला पाहिजे. तुमच्या अडचणी असतील तर सांगा त्यावर मार्ग काढला जाईल.  ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता चांगली राहणे साठी प्रयत्न करा. वेळेत पाणी नमुने तपासणी झाली पाहिजे. सध्या पाणी टंचाई लक्षात घेता गुणवत्तेकडे लक्ष द्या. 
तसेच ग्रामीण भागातील जनतेला श्वानदंश लस मिळाली पाहीजे. त्यासाठी जि.प.सेस मधुन ५०.०० लाख तरतुद आहे  परंतू या साठी  १५०.०० लक्ष (दिड कोटी) तरतुद अपेक्षित आहे. त्याबाबत पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आरोग्याच्या दृष्ट्रीने चांगले काम कसे होईल याचा आराखडा तयार करा. अशा सुचना सभापती केदार सावंत यांनी केल्या.
प्रत्येक प्रा.आ.केंद्राला भविष्यात सोलर सिस्टिम बसवण्याबाबतचे काय करता येईल याबाबतचे नियोजन करणे बाबत  जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना केल्या.अपंग मुलांचा सर्व्हे  करुन अपंग असलेल्या सर्वांना सर्टिफिकेट मिळणेबावत तालुकास्तरावर कॅम्प घेणेबाबत लवकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.
सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी आरोग्य समिती सभा अधुन मधुन तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी सुचना मांडली. गेल्या दोन वर्षापासुन तालुका आरोग्य अधिकारी यांचे वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च केलेल्या गोष्टींचे बीले पेंडींग आहेत. त्याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याबाबत व ती बीले त्यांना मिळणेबाबत आवश्यक त्या निधीसाठी पाठपुरावा करणेच्या सुचना दिल्या .
जि.प.सेस च्या २०२६-२७ च्या मुळ ५१०.०८ लक्षच्या मुळ अंदाजपत्रकाच्या विषयास शिफारस मान्यता घेण्यात आली.जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या मंजूर आराखडयास शिफारस करणेसाठी मान्यता घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages