शासकीय निवासी शाळा नजिक पिंपरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

शासकीय निवासी शाळा नजिक पिंपरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 शासकीय निवासी शाळा नजिक पिंपरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू  

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या नजिक पिंपरी (ता. मोहोळ) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ६ वी ते १० वी सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक आण्णासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.  

या निवासी शाळेत विद्यार्थ्यांना कोणतीही फी न आकारता मोफत प्रवेश दिला जात असून निवास, भोजन, पाठ्यपुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य, शालेय व क्रीडा गणवेश, शूज, स्कूल बॅग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच अद्ययावत जिम, क्रीडा साहित्य, आउटडोअर जिम, शुद्ध पिण्याचे पाणी, गरम पाण्याची सुविधा, इन्व्हर्टर, २४ तास सुरक्षा रक्षक, अभ्यासिका व सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित परिसर उपलब्ध आहे.  

शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, विज्ञान विषयासाठी आधुनिक AR-VR प्रयोगशाळा, ई-लायब्ररी, वाय-फाय सुविधा व संगणक कक्ष उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबविण्यात येतात. एनसीसी, स्काऊट-गाईड, शैक्षणिक सहली, क्षेत्रभेटी, वनभोजन तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम असून शिष्यवृत्ती व क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  

प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा, नजिक पिंपरी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी जागा प्रवर्गनिहाय आरक्षित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध – ८० टक्के, अनुसूचित जमाती – १० टक्के, विजाभज – ५ टक्के, दिव्यांग – ३ टक्के व एसबीसी – २ टक्के प्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे.  
प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी पालकांनी मुख्याध्यापकांशी 9011350908 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages