महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचा शतप्रतिशत निकाल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2026

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचा शतप्रतिशत निकाल

 महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचा शतप्रतिशत निकाल



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून टेंभुर्णी येथील महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हा उत्तम नमुना मानला जात आहे.

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी यशस्वी ठरले असून टेंभुर्णी केंद्र व परिसरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान विभागात शंभर टक्के निकालाची कामगिरी करणारे हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे. त्यामुळे संपूर्ण टेंभुर्णी परिसरातून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यंदाच्या परीक्षेत ज्ञानेश्वरी देशमुख हिने ८५.६७ टक्के गुण मिळवत टेंभुर्णी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रथमेश गवळी याने ८१.५० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तसेच श्रुती दळवी हिने ८१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर नाव कोरले. या तिन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून एकूण १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ४३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश मिळवले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे पालक, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल माढा तालुक्याचे आमदार मा. अभिजित आबा पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे, जिल्हा परिषद सोलापूर महिला व बालकल्याण सभापती ॲड. अमृताताई वाघे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. नारायण भानवसे सर, विद्यालयाचे प्राचार्य विजय यादव सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शोएब बागवान सर तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजने ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून दिल्यामुळे दरवर्षी उल्लेखनीय यश मिळत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

चौकट

“प्रयत्न, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावरच ग्रामीण भागात अशा प्रकारचे घवघवीत यश संपादन करता येते. महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजने टेंभुर्णी व परिसरात गुणवत्तेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages