सोलापूरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

सोलापूरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला

 सोलापूरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील मुदत संपलेल्या (२०२४ व २०२५) तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत येत्या १२ जून रोजी काढण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २७ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७०१ ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश आहे.

आरक्षण प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असली, तरी गावपातळीवर पॅनेल राजकारणाला अद्याप महत्त्व आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागू होणार आणि कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळणार, याकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रभागरचना अंतिम केली असून, आरक्षण प्रक्रिया १० जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या सुमारास ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...असे आहे आरक्षण सोडतीचे वेळापत्रक

८ जून : ग्रामसभेची अधिसूचना प्रसिद्ध

१२ जून : विशेष ग्रामसभा व आरक्षण सोडत

१९ जून : प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण प्रसिद्ध

१९ ते २५ जून : हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत

३ जुलै : हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय

१० जुलै : अंतिम प्रभाग आरक्षण प्रसिद्ध

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages