ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार

 ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार 

सांगोला (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीसमोरील अडीअडचणी व विविध ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून ग्रंथालय क्षेत्राला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले.

दि. २९ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ तसेच सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेण्यात आली. यावेळी ग्रंथालय चळवळीसमोरील विविध समस्या, अनुदानातील अडचणी, कर्मचारी प्रश्न, ग्रंथालयांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ग्रंथालय चळवळीचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अमोघसिद्ध कोळी, सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हरिदास घोडके, प्रमुख कार्यवाह अशोक व्हटे उपस्थित होते.

तसेच सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे पदाधिकारी राजेंद्र इंगोले, औदुंबर काळे, बिरुदेव काळे, रणजित भगत, विजय जगताप, रणजित भंडारे, आनंदा ढोले, राम जगताप, दत्तात्रय पाटील, सतीश इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथालय चळवळीच्या प्रश्नांबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ग्रंथालय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages