मोहोळ शहरासाठी पाणीपुरवठा करणारी नवीन पाईप लाईन करण्यात यावी
उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे आणि नगरसेविका शाहिस्ता परविन मुस्ताक शेख यांची मागणी
मोहोळ (कटूसत्य वृत):- मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन ही अत्यंत जुनी आणि जीर्ण झाले आहे त्यामुळे मोहोळ शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित होत आहे. पाण्याच्या दाबाने जीर्ण झालेली पाईपलाईन वारंवार लिकेज होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकत करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने आम्हाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.तरी प्रशासनाने नवीन पाईप लाईन करून घेण्यात यावी. अशी मागणी मोहोळचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे आणि प्रभाग क्रमांक चारच्या भाजप नगरसेविका शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख यांनी मोहोळचे नगराध्यक्ष सिद्धी ताई वस्त्रे आणि मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सहकार राज्य परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांनी मंजूर केलेल्या येवतीतील पाणीपुरवठ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून मोहोळ शहरासाठी सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
याबाबत माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की म्हटले आहे की यापूर्वी २४ तास लाईट कनेक्शनची कमतरता असल्याने पाणी पुरवठा होत नव्हता परंतु आता २४ तास लाईटची सोय देखील करण्यात आली परंतु अद्यावत पाईपलाईन अभावी मोहोळचा पाणीपुरवठा खंडित होत आहे.आहे.नदीवरून येणारी नवीन टाकली तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्याचा वापर करण्यास मदत होईल. तरी प्रस्ताव मंजूर करून नवीन लाईन करण्याबाबत प्रशासनच कळवले.
असल्यामुळे नवी पाईपलाईन करण्याची मागणी नगराध्यक्ष खवळे आणि नगरसेविका शेख यांनी केली आहे. यावेळी ही मागणी शासन स्तरावर तात्काळ पाठवून याला मंजुरी घेऊन आवश्यक ती कार्यवाही होईल असा विश्वास यावेळी मोहोळचे मुख्याधिकारी डॉ. डोके यांनी उपस्थितांना दिला

No comments:
Post a Comment