झारखंडच्या कृषि आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

झारखंडच्या कृषि आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

 झारखंडच्या कृषि आयुक्तांनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद




बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री .शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय याच्या अलीपूर येथील कृषी प्रक्षेत्रामधील विविध विकास कामाची पाहणी तसेच द्राक्ष लागवडीचा शुभारंभ, झारखंड राज्यामध्ये वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या  तसेच संस्थेचे माजी विद्यार्थी रमेश घोलप यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमानिमित्त श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे कृषीभूषण राजाभाऊ देशमुख , नितीन बापू कापसे, नागेश अक्कलकोटे , प्रक्षेत्र अधीक्षक डॉ. शेंडे एस. एस., प्रा. आशा आदलिंगे , प्रा. शितल शेळके, कृषी सहाय्यक संकेत कांदे व प्रथम वर्षातील विद्यार्थी आधी उपस्थित होते. द्राक्ष लागवडचा  रमेश घोलप यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर त्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला यामध्ये त्यांनी कृषीचे विद्यार्थी म्हणून समाजासाठी आपण कोणत्या प्रकारे कार्य केले पाहिजे ,आपलं करियर कसं निवडलं गेलं पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये मध्ये जाण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केला अभ्यास कसा प्रकारे केला पाहिजे  याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages