शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; २१.४३९ किलो गांजा जप्त
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना थोबडे वस्ती, जुना देगांव नाका परिसरात संशयास्पद हालचाली करणारा एक इसम आढळून आला. तो झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून गांजाच्या पुड्या विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.
सदर इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रजाक गफुर शेख (वय ४९, रा. थोबडे वस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता २२७ ग्रॅम गांजा आढळून आला. पुढील चौकशीत आरोपीने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरात छापा टाकून एकूण ५९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१.२१२ किलो ग्रॅम असून, पिशवीतील गांजासह एकूण २१.४३९ किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ नोंदवण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम २० (अ), २० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
.png)
No comments:
Post a Comment