बालगोपाळांशी महापौर कोंड्याल यांनी साधला संवाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 7, 2026

बालगोपाळांशी महापौर कोंड्याल यांनी साधला संवाद

 बालगोपाळांशी महापौर कोंड्याल यांनी साधला संवाद


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील रत्नमंजिरी सोसायटी, विजापूर रोड येथे असलेल्या गणेश नाईक विद्या मंदिर आणि मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार पाटील प्रशालेत आज नवनिर्वाचित महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या संस्थेचे संस्थापक, माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार-पाटील आणि कोंड्याल परिवाराचा जुना ऋणानुबंध आहे. त्या स्नेहपूर्ण जिव्हाळ्यामुळेच  महापौर झाल्यानंतर शाळेतील विनायक कोंड्याल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी यावं अशी अण्णांची इच्छा होती. आज सकाळी महापौरांनी आवर्जून शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बघून शाळेतल्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कोंड्याल यांनी कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्या समोर कृतीशील 19 खडीचा अभिनव उपक्रम सादर केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे सामूहिक सादरीकरण केले. कवी कलश यांच्या "इंद्रजमी जंभ पर.." हा छंद इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सादर केला तसेच महात्मा फुले यांचे विचार या विद्यार्थ्यांकडून ऐकताना महापौरांना कौतुकास्पद वाटले. सत्कारानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात महापौर विनायक कोंड्याल यांनी शाळेतल्या शिक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक केले. कष्टकरी वर्गातील मुलांना घडवण्यासाठी माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांची सुरू असलेली धडपड खरोखर प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शिवशरण अण्णा पाटील यांनी देखील महापौर विनायक कोंड्याल यांचे विशेष कौतुक केले. कमी काळात नगरसेवक म्हणून पाडलेली छाप आणि आजवरची वाटचाल पाहता निश्चितच कोंड्याल यांच्या हातून सोलापूरच्या हिताचे आणि विकासाचे काम पार पडेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगल्या कार्यासाठी सदैव पाठीशी राहीन असा विश्वास देत माजी आमदार शिवशरण बिराजदार-पाटील यांनी महापौरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार पाटील, मुख्याध्यापिका ज्योती आळगी मॅडम मंचावर उपस्थित होते. मदन पोलके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages