स्वामी भक्तांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी अग्रक्रम- न्यायमूर्ती पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 7, 2026

स्वामी भक्तांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी अग्रक्रम- न्यायमूर्ती पाटील

 स्वामी भक्तांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी अग्रक्रम- न्यायमूर्ती पाटील


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रक्रम दिल्याचे मनोगत मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह, मुंबई, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ओमशंकर पाटील सोलापूर, अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय अॅड. अमोग सिंह, नेदरलँड् चे उद्योजक मनोज कोळी यांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह मुंबई हे बोलत होते.

यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅड.डॉ. प्रदिपसिंग राजपूत सोलापूर, न्यासाचे कायदेविषयक सल्लागार अॅड. संतोष खोबरे, सचिव शामराव मोरे, मनोज निकम, सौरभ मोरे, अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार संजय भंडारे (महासूल), अक्कलकोटचे मंडल अधिकारी जे.एफ. नदाफ, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील राजशिष्ठाचार विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एल.एन. भांगरे, एन. बी. सुरवसे, पो.ना. प्रमोद गायकवाड, दिलीपराव राऊत, प्रवीण देशमुख, अतिश पवार, गोटू माने, गणेश पाटील, प्रवीण घाटगे, सनी सोनटक्के, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, बाळासाहेब घाटगे, आकाश कडबगांवकर, योगेश कटारे, बाळासाहेब पोळ, विनायक भोसले, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, नुर खासबागदार, निखील पाटील, एस.के.स्वामी, सोलापूर न्यायालयाचे नाईक- धनंजय कलमदाने, अविनाश सुरवसे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, शिव स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages