वाहन चोर 24 तासात जेरबंद, अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 7, 2026

वाहन चोर 24 तासात जेरबंद, अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक

 वाहन चोर 24 तासात जेरबंद, अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक

अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी विविध गुन्हयातील शोध लावत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत.नुकतीच चोरीला गेलेली चार चाकी वाहनाचा शोध लावत चोवीस तासाच्या आत गाडीसह चोरट्याला पकडण्यात अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीसांना यश आले आहे.
        या गुन्हाबाबत अकलूज पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीपशिंग नरेंद्रशिंग राजपूत (वय ४६ वर्षे) व्यवसाय आचारी रा.बागेचीवाडी (ता.माळशिरस) यांची दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी रात्री ००.३० ते ०५.०० वाजण्याचे सुमारास पाटीदार मंगल कार्यालय बायपास रोड अकलुज येथुन फिर्यादीचे मालकीची इको कार नंबर एम.एच. ४५/ए. क्यु. ८९७० ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. २२१/२०२६ बी.एन.एस.क. ३०३(२) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द दिनांक ०२/०४/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील इको कार व अज्ञात आरोपीचा सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या अधारे शोध घेवून २४ तासाचे आत आरोपी आकाश रामभाऊ रोकडे वय २७ वर्षे रा. वाघोली पुणे यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस अंमलदार, शिवकुमार मदभावी,, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, विनोद साठे, पंडित गवळे बबलू गाडे सायबर सेल निक्स पवार यांनी कामगिरी केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages