प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाचा स्थापना दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे लाईन परिसरातील सोनामाता प्रशालेसमोर असलेल्या नगरसेवक किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि राष्ट्रीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. यावेळी बालगोपाळांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले ४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे राष्ट्रसेवेची या भावनेतून साजऱ्या करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ध्वजारोहणानंतर बालगोपाळांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली ताई शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड आणि युवा नेते चेतन नागेश गायकवाड यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले यावेळी बोलताना किसन जाधव यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. पक्षाने गेल्या चार दशकांत देशाच्या विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवलेली सेवा हीच भाजपाची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनीही याच विचारसरणीने समाजसेवेत सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण राम शिवप्पा गायकवाड, वैभव प्रचंडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार देवेंद्र कोठे आणि भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस प्रभाग क्रमांक २२ मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
.png)
No comments:
Post a Comment