पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकला

 पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकला

अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातील लोणंद पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पातील फलटण  पंढरपूर (सुमारे १०९ कि.मी.) हा टप्पा अद्ययावत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) रेल्वे मंडळाकडे सादर करूनही अपूर्ण आहे का? असल्यास त्याचा तपशील काय?प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीपूर्वी नीती आयोगाकडून काही निरीक्षणे/सूचना प्राप्त झाल्या आहेत का? असल्यास त्यावर सरकारने कोणती पावले उचलली आहेत? 

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांना केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तर दिले की,फलटण - पंढरपूर नवीन रेल्वे मार्ग (१०९ किमी) प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून DPR तयार करण्यात आला आहे. DPR तयार झाल्यानंतर प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारसह विविध संबंधित घटकांशी सल्लामसलत करावी लागते. तसेच नीती आयोग, अर्थ मंत्रालय इत्यादी संस्थांची मान्यता आवश्यक असते. 

संबंधित टप्प्याच्या मंजुरीत व काम सुरू करण्यात झालेल्या विलंबाची कारणे काय आहेत? प्रकल्पाला गती देण्यासाठी, काम सुरू करण्यासाठी आणि निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सरकारकडून कोणती ठोस पावले उचलली जात आहेत या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी उत्तरात सांगितले प्रकल्पांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी आणि गतिमान असते. त्यामुळे विविध संस्थांकडून मिळणाऱ्या मंजुरी व परीक्षणांवर अंतिम कालमर्यादा अवलंबून असते.

दरम्यान, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग हा पंढरपूरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा आणि ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारा प्रकल्प असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये त्याबाबत मोठी अपेक्षा आहे. मात्र, सध्या हा प्रकल्प प्रशासकीय मंजुरीच्या टप्प्यातच अडकून असल्याचे प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित कालावधी सांगता येणार नसल्याचे केंद्र सरकारच्या सरकारच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages