विद्यार्थ्यांनी देशासाठी अर्थपूर्ण योगदान द्यावे - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 17, 2026

विद्यार्थ्यांनी देशासाठी अर्थपूर्ण योगदान द्यावे - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे

 विद्यार्थ्यांनी देशासाठी अर्थपूर्ण योगदान द्यावे - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे

टीएमपीव्हीएल व पीसीयू मेकॅट्रॉनिक्स प्रोग्रामच्या पहिल्या तुकडीचे स्वागत 







पिंपरी, पुणे(कटूसत्य वृत्त):-   नवीन तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. शिक्षण वर्ग खोल्यांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे साधन बनले पाहिजे. यातून विद्यार्थ्यांनी देशासाठी अर्थपूर्ण योगदान द्यावे असे प्रतिपादन पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी केले. 
  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड (टीएमपीव्हीएल) यांच्या संयुक्त सहयोगाने कौशल्य आणि नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) अंतर्गत मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी सर्टिफिकेट व डिप्लोमा प्रोग्रामच्या पहिल्या तुकडीचे उद्धघटन आणि स्वागत करण्यात आले.
यावेळी टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी प्लांट हेड नीरज अग्रवाल, एचआर हेड विवेक बिंद्रा, कॉर्पोरेट लर्निंग अँड डेव्हलपमेंट हेड डॉ. रंगा गुंटी, आणि ईआर हेड संतोष बढे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, प्रोग्रामचे हेड डॉ. उमेश पोतदार, डॉ. अमित पाटील (डीन, स्कूल ऑफ मॅनेजमेंट), डॉ. विजय पाटील (डीन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग), डॉ. अभिजीत बनुबाकोडे (डायरेक्टर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डॉ. भारत काळे (डायरेक्टर, संशोधन व विकास), डॉ. कमलेश मेश्राम (हेड, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स), डॉ. नीरू मलिक (असोसिएट डायरेक्टर, सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप), डॉ. पल्लवी आहिरे, डॉ. प्रणव चरखा, डॉ. सतपालसिंग राजपूत, डॉ. शंकर देवसरकर, डॉ. स्वाती शिर्के, डॉ. रामदास बिरादार, आदी उपस्थित होते.
   पीसीइटी विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य व उद्योजक अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  टाटा मोटर्सचे प्लांट हेड नीरज अग्रवाल यांनी सांगितले की, या संयुक्त उपक्रमामुळे उद्योग व शैक्षणिक संस्था सहकार्य वाढून विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ सैद्धांतिक न राहता प्रत्यक्ष अनुभव, शिस्त आणि नवोन्मेष यांद्वारे समृद्ध होईल. यामुळे कुशल तांत्रिक मनुष्यबळ विकसित होऊन भविष्यात सक्षम व्यावसायिक घडतील असा विश्वास आहे.
    प्रोग्रामचे हेड डॉ. उमेश पोतदार यांनी सांगितले की, वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव यांचे प्रभावी एकत्रीकरण करून हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यांना शिकण्याची, काम करण्याची आणि या माध्यमातून आयुष्य बदलण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण आणि औद्योगिक, व्यावहारिक अनुभव घेऊन सक्षम बनतील. प्राध्यापकांनी अत्याधुनिक असेंब्ली लाईन्स, रोबोटिक ऑटोमेशन आणि महिला नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उत्पादन विभागास भेट देऊन माहिती घेतली. 
  स्किल डेव्हलपमेंट हेड शशिकांत रोडे यांनी टाटा मोटर्स प्लांटचा इतिहास, सध्याचे उपक्रम आणि भविष्यातील दृष्टीकोन याबद्दल माहिती दिली. सुत्र संचालन पूनम बोरले यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages