सभापती संस्कृती सातपुते यांच्याकडून समाज कल्याणची पाहणी , कार्यालयाची अवस्था पाहून संताप
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी मुख्यालयात आपल्या कामांची जोरदार सुरुवात केली आसुन त्या सध्या ऍक्शन मोडवर आहेत. समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाला सभापती संस्कृती सातपुते यांनी अचानक भेट दिली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरील फायली त्यांनी तपासल्या, कपाट तपासली मात्र तेथील कार्यालयाची अवस्था पाहून सभापती संस्कृती सातपुते यांनी संताप व्यक्त केला. त्याच दरम्यान समाज कल्याण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची पाहणी केली, तिथली परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. व तातडीने आतील स्वच्छता करून ही लायब्ररी पुन्हा सुरू करण्याच्या सूचना तेथील संबधीतांना सभापती संस्कृती सातपुते यांनी दिल्या.अचानक सभापती
संस्कृती सातपुते कार्यालयात भेट देण्यासाठी आल्याने कर्मचारी धावपळ निर्माण झाली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सभापती संस्कृती सातपुते यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी
प्रभारी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाज करताना अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले.
फोटो ओळी : समाज कल्याण कार्यालयाची पाहणी करताना सभापती संस्कृती सातपुते

No comments:
Post a Comment