सोलापूरात ‘यश लॅक्मे सलून’चा आज शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील उद्योजक सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांनी सौंदर्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकत ‘यश लॅक्मे सलून’ या अत्याधुनिक उपक्रमाचा शुभारंभ
बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सात रस्ता, मोदीखाना येथे पार पडणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना सुयश खानापुरे यांनी सांगितले की, रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सौंदर्य सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सोलापूरकरांना महानगरांप्रमाणे आधुनिक आणि उच्च दर्जाच्या ब्युटी सेवा उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनाली खानापुरे यांनी सांगितले की, ‘लॅक्मे सलून’ हा देशातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह ब्रँड असून, ४० वर्षांहून अधिक अनुभवाच्या जोरावर त्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.देशातील १२५ हून अधिक शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त शाखांद्वारे सेवा देणाऱ्या या प्रतिष्ठित ब्रँडची सुविधा आता सोलापूरकरांसाठी उपलब्ध होत आहे.
हेअर कट, हेअर कलरिंग, स्किन केअर, फेशियल, ब्रायडल मेकअप आणि आधुनिक ग्रूमिंग सेवा यामध्ये हा ब्रँड विशेष प्रसिद्ध आहे.‘यश लॅक्मे सलून’मध्ये ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशिक्षित स्टायलिस्ट, अनुभवी ब्युटी एक्सपर्ट्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन यामुळे ग्राहकांना एक वेगळा आणि समाधानकारक अनुभव मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यास शहरातील मान्यवर, व्यावसायिक तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस उद्योजक मयूर दरगड, लॅक्मे समूहाचे आदित्य पेठकर आदी उपस्थिती होते.

No comments:
Post a Comment