प्रदेश कार्यालय मुंबई येथे अनुसूचित जमाती मोर्चा बैठक संपन्न
मुंबई (कटूसत्य वृत्त):- नरिमन पॉईंट मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या सूचनेनुसार अनुसूचित जमाती मोर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रथम नागपूर येथील आदिवासी समाजातील राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या सौ.मायाताई ईनवते व अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार देवराज होली यांचा सत्कार प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व नंतर सभेला सुरुवात झाली त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारलेल्या भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकारी यांना कशाप्रकारे राबवाव्यात याबाबत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मुद्देसूदपणे सांगितले.
तसेच आदिवासी लोकांना जातीचे दाखले, रेशन कार्ड,रहिवासी दाखला,मिळत नसल्यामुळे शासनाच्या अनेक योजना पासून त्यांना वंचित रहावे लागत आहे असे प्रमुख पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता प्रत्येक तालुका जिल्हा निहाय वरील बाबीचा विचार करून सर्व कागदपत्राची पूर्तता करण्यात येईल असे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी सांगितले.
आदिवासी पारधी समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून त्याची समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री अशोक उईके, यांनी जातीने लक्ष घातले आहे त्यामुळे भविष्यात येणाऱ्या काळात आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांना आर्थिक बळ मिळाल्याने समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागणार नाही असे मनोगत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवले.
नव्याने राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेल्या नागपूरच्या माजी नगराध्यक्ष सौ.मायाताई इनवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले की मला अचानक पणे राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती झाल्याचे कळताच मला विश्वासच बसला नाही इमानदारीने एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करत राहिल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदिवासी समाजाला एक प्रकारे न्याय दिला आहे असे भावनिक होऊन मनोगत व्यक्त करताना उपस्थित सभागृहात भारत माता की जय,वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला व टाळ्यांचा कडकडाट होऊन आवाज घुमत राहिला.
यावेळी व्यासपीठावरील प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी मंत्री अशोक उईके,खासदार मायाताई इनवते,आमदार हरिश्चंद्र भोई,अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष देवराज होली, प्रदेश संयोजक किशोरजी काळकर, एस.टी. मोर्चा महामंत्री सुदर्शन शिंदे,यांची मुद्देनिहाय प्रेरणादायी भाषणे झाली.
सदर प्रसंगी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती त्यामध्ये प्रामुख्याने एस.टी. मोर्चा उपाध्यक्ष कोमल चव्हाण, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भिमराव चव्हाण,पुण्याच्या नगरसेविका सौ.राजश्री काळे, एस.टी मोर्चा सचिव नकुल चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले, Adv सुरेश काळे, उद्धव भोसले, साहित्यिक-समाजसेवक देविदास काळे, शिवा काळे-मुंबई, रमेश पवार, सचिन काळे, शितल काळे, बाईती बाई काळे.आदीसह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment