एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या - आनंद कुमार सिन्हा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या - आनंद कुमार सिन्हा

एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या - आनंद कुमार सिन्हा





पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):- तंत्रज्ञान हे जागतिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. आज जागतिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या टप्प्यावर आहे. एआय, जेनरेटिव एआय आणि एजेंटिक एआय हे एआय चे टप्पे आहेत. एआय हे स्पर्धक नसून सहकार्य करणारे साधन आहे. मात्र एआयचा वापर करताना नैतिकतेला महत्व द्या असे मार्गदर्शन ग्लोबल सीआयओ अँड टेक्नॉलॉजी व्हिजनरीचे आनंद कुमार सिन्हा यांनी केले.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठच्या (पीसीयू) स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे आयइइइचा (आय ट्रिपल इ - IEEE)  शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयइइइ एसीएम टीम चे उद्घाटन करण्यात आले. 
    अलिअक्सान्द्र मात्सुकौ यांनी बेलारूस देशाबद्दल माहिती देताना सांगितले की, बेलारूस हा औद्योगिकदृष्ट्या सक्षम, प्रगत शेती आणि विकसित सेवा क्षेत्र असलेला देश आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात भारत – बेलारूस सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. बेलारूस देशाची उच्च वैज्ञानिक क्षमता असून हे युरेशियन बाजारपेठेत प्रवेशासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. 
    यावेळी बेलारूस देशाचे प्रतिनिधी अलिअक्सान्द्र मात्सुकौ, पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे, कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंगचे संचालक डॉ. अभिजीत बानूबकोडे,  कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ. स्वाती शिर्के देशमुख आदी उपस्थित होते. 
    पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अवांतर तांत्रिक शिक्षणासाठी आयइइइ मधील सहभाग उपयोगी ठरेल. 
    प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले की, उद्योगात काय घडत आहे याची माहिती, नेटवर्किंगची संधी, आणि व्यावसायिक मानके समजून घेण्यासाठी अशा व्यासपीठाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आणि नेटवर्किंग, टीम बिल्डिंग, नेतृत्व कौशल्य, तांत्रिक ज्ञान विकसित करावे. 
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य व उद्योजक अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages