अकलूजच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

अकलूजच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

 अकलूजच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संस्कृती सातपुते यांनी सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची काल सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. विशेषतः माळशिरस मतदारसंघातील अकलूज परिसरात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था असूनही, तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहे. हक्काची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक आणि निवासविषय अडचणींना सामोरे जावे लागत आहे, ही बाब सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या वसतिगृहाला तातडीने स्वतंत्र आणि मालकी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. या मागणीला जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

चौकट:

"ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या आशेने अकलूजला शिक्षणासाठी येतात. त्यांना पोषक वातावरण आणि हक्काची इमारत मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे."
— संस्कृती सातपुते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages