उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

 उजनी धरणातून सहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी विसर्गात वाढ करत तो 6 हजार क्युसेकने करण्यात आला आहे. या पाण्याने उजनी धरणाखालील टेल एंड हिळ्ळी बंधारापर्यंतचे 23 बंधारे भरून घेतले जाणार आहेत.

त्यासाठी 272 किलोमीटर अंतराचा प्रवास उजनीतील पाण्याला करावा लागणार आहे.

दरवर्षी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडले जाते होते. परंतु, मागील सहा महिन्यांपूर्वी उजनी ते सोलापूर समातंर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने औज, चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडणे बंद झाले आहेत. त्यामुळे भीमा नदी ही कोरडीठाक पडली आहे. पाण्याअभावी पिके करपून जात आहे. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे उजनीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages