संदीप जव्हेरी यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

संदीप जव्हेरी यांचे निधन

 संदीप जव्हेरी यांचे निधन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील जव्हेरी ॲडव्हर्टायझिंग ग्रुपचे प्रमुख संचालक संदीप अरविंद जव्हेरी यांचं शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 26 रोजी सायंकाळी पाच वाजता रेल्वे लाईन्स जुन्या आरटीओ कार्यालय येथील राहत्या घरी निधन झालं. वय ते 54 वर्षांचे होते. 

     संदीप जव्हेरी यांचा पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.  दि. 25 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघणार असून मोदी विद्युत दहिनी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

संदीप जेव्हेरी हे सोलापुरातील गुजराती मित्रमंडळाचे गेली 25 वर्षे सहसचिव होते. याचबरोबर ते रोटरी क्लब सोलापूरचे सदस्य आणि आगामी अध्यक्ष होते. रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना, सेंट जोसेफ प्रशाला माजी विद्यार्थी संघ ,यासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेत ते कार्यरत होते. याचबरोबर सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते . संदीप जव्हेरी यांनी मरणोत्तर नेत्रदान केलं आहे.

संदीप जेव्हेरी यांच्या पश्चात आई, दोन विवाहित भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages