जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाची जनजागृती रॅली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाची जनजागृती रॅली

 जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाची जनजागृती रॅली





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्त वीणा पवार, आरोग्याधिकारी डॉ.राखी माने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग अंतर्गत नागरी हिवताप योजना व जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपुर (उपपथक) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ.ज्ञानेश्वरी महेश देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, शहर क्षयरोग अधिकारी डाॅ.अरुंधती हराळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीची सुरवात करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात यामध्ये सहभाग नोंदवून शहरातील नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.
यावेळी जीवशास्त्रज्ञ स्वाती अनपट व नागरी हिवताप विभागातील अधिकारी,कर्मचारी व आशाताई मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages