महापालिकेची २३० कोटींची करवसुली; मागील वर्षापेक्षा ४० कोटींची वाढ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

महापालिकेची २३० कोटींची करवसुली; मागील वर्षापेक्षा ४० कोटींची वाढ

 महापालिकेची २३० कोटींची करवसुली; मागील वर्षापेक्षा ४० कोटींची वाढ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने गत आर्थिक वर्षात सुमारे २३० कोटी रुपयांची करवसुली केली असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४० कोटी रुपयांनी अधिक असल्याची माहिती विभागप्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली.

शहरातील सुमारे २ लाख ७५ हजार मालमत्तांची नोंद महापालिकेकडे असून, या वर्षी ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत वसुली काही प्रमाणात कमी असली तरी एकूण वसुलीत वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१४ मार्च रोजी झालेल्या लोकअदालतीनंतर थकबाकीदारांसाठी कर व दंडावर ५० टक्के सूट देणारी योजना सुरू करण्यात आली. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून केवळ १७ दिवसांत ९ हजार ४५३ थकबाकीदारांनी १७ कोटी २४ लाख ९९ हजार २४५ रुपयांचा कर जमा केला.

३१ मार्च रोजी एकाच दिवशी १ हजार ४०८ मिळकतदारांनी २ कोटी ८८ लाख ६२ हजार ९८० रुपयांची भर घातली. यामुळे एकूण वसुली २३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दरम्यान, इतर स्त्रोतांमधून मिळून महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने एकूण २७९ कोटी ३९ लाख २५ हजार ३०० रुपयांची वसुली केली आहे. महापालिकेने गत आर्थिक वर्षात ८७.७४ टक्के वसुली साध्य केली असून सुधारित अंदाजपत्रकातील २४० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ८२ टक्के वसुली झाल्याची माहिती गाडेकर यांनी दिली.

कर वसुलीत झालेली वाढ ही महापालिकेसाठी सकारात्मक बाब मानली जात असून, आगामी काळात वसुली आणखी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages