सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात





सोलापूर‌ (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केगाव येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक घोषवाक्ये सादर करून वातावरण उत्साही केले. यावेळी विज्ञान शिक्षिका डॉ. सबा शेख यांनी प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य यांचा अंगीकार केल्यास निरोगी जीवन जगता येते, असे त्यांनी सांगितले. “आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी असणे होय,” असेही त्यांनी नमूद केले.



याप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करणे आवश्यक असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे त्यांनी सांगितले.



यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना “आरोग्यासाठी एकजूट : विज्ञानाच्या पाठीशी उभे राहूया” अशी असून विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक योग्य माहिती स्वीकारून अफवांपासून दूर राहावे, असेही आवाहन करण्यात आले.


या कार्यक्रमास मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, उपमुख्याध्यापिका निकहत शेख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी निरोगी जीवन जगण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages