अनगरच्या पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
या कार्यक्रमात एन.सी.आर.टी.चे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक कार्तिक स्वामी देशमाने यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध दिशा व संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे आणि आयुष्यात आनंदी व यशस्वी कसे राहावे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख गोरख गायकवाड, कला विभाग प्रमुख रमेश चव्हाण, प्राध्यापिका उज्वला घोलप व संगणक तज्ञ संतोष टकले यांनीही विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शाखांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (माजी प्राचार्य) चंद्रकांत ढोले, प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, प्रवेक्षक राजेंद्र डोके, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक, माध्यमिक विभागातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक सत्यवान कांबळे, पांडुरंग शिंदे, दाजी गुंड, सत्यवान दाढे, सोमनाथ ढोले, डॉ. प्रशांत कुलकर्णी, परमेश्वर कुंभार, शमा काझी, अर्चना गुंड आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव पवार यांनी केले तर सूत्रसंचालन सोमनाथ ढोले यांनी केले.
शाखेची निवड करताना गोंधळलेल्या विद्यार्थी व पालकांना समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन देण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरला.
.png)
No comments:
Post a Comment