श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळकाल्याने सांगता
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये आज गुरूवारी सायंकाळी ७ वाजता मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दही हंडी फोडून मोठ्या भक्तीभावात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची गोपाळकाल्याने सांगता झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस परंपरे प्रमाणे सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन, अभंग, गवळण व भारूड सेवा सादर झाली. या कार्यक्रमात देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सुरेखा तेली, शकुंतला कटारे, स्वाती गंभीरे, सारिका फुटाणे, निंगुुताई हिंडोळे, कौशल्या जाजू, मिनाक्षी शिंदे, कुंदा नखाते, लता कुलकर्णी, वैजयंता निंबाळकर, सुवर्णा जाधव, प्रज्ञा देशपांडे, स्वरा जोशी, प्रतिभा कुलकर्णी,
यांनी विविध अध्यात्मिक व धार्मिक भजन भारूड सादर केले.
सायंकाळी ७ वाजता उपजोनिया पुढती येऊ ! काला खाऊ दहीभात !! वैकुंठी तो ऐसे नाही ! कवळ काही काल्याचे !! एकमेका मुखी घालू ! सुखी देऊ हंबरी !! तुका म्हणे अवघे बरवे वाळवंट उत्तम !! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली. यानंतर मंदार महाराज पुजारी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते दहीहंडी काला फोडून गोपाळकाला गोड झाला ! गोविंदाने गोड केला !! या नामघोषात गोपाळ काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. उपस्थित हजारो स्वामी भक्तांनी यावेळी प्रसादाचा लाभ घेतला. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाल्याची माहिती देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, रामचंद्र समाणे, प्रा.शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, मोहन शिंदे, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले,
ज्ञानेश्वर भोसले, सचिन हन्नुरे, ऋषिकेश लोणारी, प्रसन्न हत्ते, अक्षय सरदेशमुख, प्रसाद पाटील सर, प्रसाद किलजे, अमर पाटील, रमेश शिंदे, खाजप्पा झंपले, बाळासाहेब कुलकर्णी, मनोज जाधव आदींसह देवस्थानचे कर्मचारी सेवेकरी आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment