शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी मधुकर पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील शरदचंद्र पवार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी मधुकर पवार यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ पवार हे छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज मध्ये मराठी विभाग प्रमुख महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून काम केले आहे. आता त्यांची शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी निवड करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने, संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment