मुख्यमंत्री फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही - कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही - कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे

मुख्यमंत्री फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही - कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. आमदार संजय गायकवाड याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, महाराष्ट्रातील आई बहिणींच्या वर शिवीगाळ करत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूणाचे समर्थन केले आहे, छत्रपतींच्या पुस्तक प्रकाशक प्रशांत आंबीला जीवे मारण्याची धम दिली आहे; यासोबतच बागेश्वर धामचा धरेंद्र शास्त्री याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा वाद पुन्हा निर्माण केला जात आहे. यापूर्वीही कोशारीने छत्रपतींचा, महात्मा फुलेंचा, भाऊराव पाटील यांचा अपमान केला आहे. इंग्रजांची हुजरेगीरी करणारे व स्वातंत्र्यसंग्रामामध्ये नसणारी आरएसएस-भाजपा आज सत्तेवर बसली आहे. हे सर्व तेच घडवून आनत आहेत; नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी असे गुंड पाळले आहेत. छत्रपती शिवाजी-फुले -बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्यासाठीच भाजपचा जन्म झाला आहे. इतिहास बदलण्याचेकाम भाजप करीत आहे. मुख्यमंत्री जोपर्यंत आमदार संजय गायकवाड या आमदाराला अटक करत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणता अधिकार त्यांना आहे ? असा प्रश्न कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी केला. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दिनांक 27 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी शिवसृष्टी बार्शी येथे झालेल्या आमदार संजय गायकवाडला अटक करण्याच्या मागणीच्या निदर्शने आंदोलनामध्ये बोलत होते. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, बामसेफचे तानाजी बोकेफोडे, काँग्रेसचे निखिल मस्के, सतिश पाचकुडवे, अजित कांबळे, अनिसचे पा.न. निवाणीकर, सत्यभामा जाधवर, जनाबाई लोकरे, उडाण फाउंडेशनचे जमील खान, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, डॉ. प्रवीण मस्तुद, डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे लहू आगलावे, बांधकाम कामगार संघटनेचे अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे , बार्शी नगरपालिका कंत्राटी कामगार संघटनेचे शौकत शेख, भारत भोसले, भारत चव्हाण, अखिल भारतीय किसान सभेचे लक्ष्मण घाडगे, धनाजी पवार , आनंद गुरव, श्रीकांत सोरेगांवकर, अब्बास बागवान, भारती मस्तुद , निर्मला सरवदे, सुनिल ढगे, प्रमोद मंडलिक आदी उपस्थित होते.


 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages