शाळेतील बेकायदेशीर वसुली रोखण्यासाठी धडक कारवाई करावी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील काही शाळा, विद्यालय व महाविद्यालयात शाळेचा दाखला देताना, व शाळा प्रवेशासाठी मोठी रक्कम मागण्याचा प्रकार घडत असतो अश्यामुळे विध्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार रोखण्याकरिता शासनाने धडक कारवाई भरारी पथकाची नियुक्ती करून हे बेकायदेशीर प्रकार थांबवावा* अश्या मागणीचे लेखी निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आले आहे.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेशजी शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या आदेशानुसार व विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्दी प्रमुख उमेश काशीकर व सर्व विश्वस्त आणि सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी जगताप यांना हे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी राज्यात सर्व शाळेत सर्वत्र परीक्षेचा निकाल देण्यात येतो.नेमके या "दिवशी शाळा सोडण्याचा दाखला, मार्कलिस्ट देताना काही शाळा विद्यालय, महाविद्यालयात बेकायदेशीर वसुली केली जाते, त्यानंतर नवीन वर्षात शाळा प्रवेशाच्या वेळी काही शाळा व विद्यालये बांधकाम निधी, विकास निधीच्या नावाखाली काही पालकांकडून मोठी रक्कम वसुल केले जातात तसेच शालेय साहित्य व गणवेश शाळेच्या भांडारातूनच घ्यावे अथवा ठराविक दुकानातूनच घ्यावेत अशी सक्ती केली जाते " अश्या अनेक तक्रारी स्वराज्य कडे आले आहेत. त्या अनुषंगाने स्वराज्य माहिती अधिकार संघटना विध्यार्थाच्या व पालकांच्या हितासाठी ही चळवळ हाती घेतले असून वरील बेकायदेशीर प्रकार रोखण्याकरिता जिल्ह्यात धडक कारवाई भरारी पथक नेमन्यात यावे आणि ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतात त्या शाळेवर कारवाई करत परवाना रद्द करावा अश्या मागणीचे लेखी निवेदन सोलापूर जिल्हा माध्यमिक शाळेचे शिखणाधिकारी सचिन जगताप यांना स्वराज्य चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी दिले आहेत या प्रसंगी कार्याध्यक्ष सुनिल पंडित, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, सचिव सुधाकर शहाणे, सहसचिव दत्तगुरु वेदपाठक, सहसचिव दिपक कुरुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment