सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांना वाहिली श्रद्धांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 13, 2026

सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांना वाहिली श्रद्धांजली

 सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांना वाहिली श्रद्धांजली





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज, जागतिक कीर्तीच्या, विश्वविक्रमी गायिका  पार्श्वगायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, स्वामीरत्न, सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अन्नछत्र परिवार, भोसले कुटुंबिय व अमोलराजे भोसले मित्रपरिवार, अमोलराजे लेझीम संघ यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरातील असलेल्या लता दीदी मंगेशकर यांचा रथ-आशीर्वाद या ठिकाणी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज, जागतिक कीर्तीच्या, विश्वविक्रमी गायिका  पार्श्वगायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, स्वामीरत्न, सूरसाम्राज्ञी आशा भोसले पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांना दि. १५ जुलै २०१९ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, मनोज निकम, निखील पाटील, प्रवीण देशमुख, प्रवीण घाटगे, संजय गोंडाळ, चेतन जाधव, बाळासाहेब पोळ, शहाजी यादव, सनी सोनटक्के, स्वामिनाथ बाबर, विशाल कलबुर्गी, केदार तोडकर, सुमित घाडगे, दत्ता माने, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, राजू पवार, शरद भोसले, सतीश महिंद्रकर, शुभम सावंत, विनायक भोसले, समर्थ घाडगे, प्रसाद मोरे, रोहित कदम, सुभाष पेटकर, अॅड. फहीम पिरजादे, धनंजय माने, किरण साठे, राहुल इंडे, ज्ञानेश्वर भोसले, मल्लिकार्जुन गवळी, मल्लिनाथ कोगनुरे, शिवकुमार स्वामी, महेश पाटील, पिंटू हळ्ळूरे, कुमार सलबत्ते, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, समर्थ घाटगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण, महादेव वाले, इरय्या स्वामी, हरी राऊत, मारुती बोरकर यांच्या सह महिला सेवेकरी, पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, अन्नछत्र परिवार, भोसले कुटुंबियांच्या व अमोलराजे भोसले मित्रपरिवार, अमोलराजे लेझीम संघ व स्वामी भक्त यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages