समाज कल्याण विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे 'सामाजिक समता सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी इयत्ता ७ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सोलापूरच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृती राम सातपुते यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होत असून, विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार रुजवणे आणि सामाजिक जाणीव जागृत करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
विद्यार्थ्यांना खालीलपैकी एका विषयावर आपले विचार मांडता येतील:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठी केलेले कार्य: (उदा. मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क इ.)
चवदार तळे, महाड - शताब्दी वर्ष विशेष.
मानवी हक्कांचे महत्त्व.
संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा गौरव: (१५० वी जयंतीनिमित्त).
सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment