अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 22, 2026

अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव

 अपेक्षित दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बंद पाडला कांदा लिलाव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच संतप्त होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी शेतकऱ्यांनी लिलावात भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांशी वाद घालत लिलाव बंद पाडला.

गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने तणाव वाढला होता.

या संधीचा फायदा घेत शेतकरी संघटनेने उडी घेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली.

हा वाद व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये होता असे सांगण्यात आले. दरम्यान, बाजार समितीत शुक्रवारी दहा वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. लिलाव पुकारणाऱ्यांनी लिलावाची बोली लावण्यास सुरुवात केली.

कांदा पाहताच १०० रुपयांपासून सौदेबाजी सुरू केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांद्याला हवा तेवढा भाव मिळाला नाही. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून चांगला दर देण्याची मागणी केली. बराच वेळ शेतकऱ्यांनी गोंधळ घातला.

काही शेतकरी अंगावर त्यामुळे काही काळ बाजार समितीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी व्यापारी, शेतकरी व बाजार समिती प्रशासनाची संयुक्तरीत्या बैठक झाली.

या बैठकीत योग्य तो तोडगा निघाला अन् शेतकरी शांत झाले. त्यानंतर दुपारी ११:४० वाजण्याच्या सुमारास कांदा लिलावाला सुरुवात झाली.

अवकाळीनं कांद्याचे प्रचंड मोठे नुकसान.
◼️ जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.
◼️ या पावसामुळे शेतात काढणीला आलेला व काढून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे.
◼️ त्यामुळे बाजारात विक्रीला येणारा कांदा चांगल्या प्रतीचा येत नसल्याची ओरड व्यापाऱ्यांची आहे.
◼️ अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील कांद्याचे नुकसान होत आहे.

कमाल १२१०, तर सर्वसाधारण ५०० रुपये दर
◼️ श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी १५७ ट्रक कांद्याची आवक झाली.
◼️ किमान १००, कमाल १२१०, तर सर्वसाधारण ५०० रुपये असा दर मिळाला.
◼️ सोमवारी ३१,४०८ पिशव्या, १५,७०४ क्विंटल कांद्यातून ७ कोटी ८५ लाख दोन हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages