भगवंत प्रकटोत्सवानिमित्त मुख्यमंत्री मंगळवारी बार्शीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

भगवंत प्रकटोत्सवानिमित्त मुख्यमंत्री मंगळवारी बार्शीत

 भगवंत प्रकटोत्सवानिमित्त मुख्यमंत्री मंगळवारी बार्शीत



बार्शी (कटूसत्य वृत्त):- भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प असल्याचे सांगत श्री भगवंत प्रकटोत्सवानिमित्त २८ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशीत येणार असल्याची माहिती महोत्सवाचे मार्गदर्शक तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.


ग्रामदेवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित भगवंत महोत्सव आता बार्शीकरांसाठी आकर्षण ठरला आहे. येत्या काळात श्री भगवंत मंदिर व परिसराचा सर्वागीण कायापालट करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या आगमनामुळे तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्राच्या उभारणीसाठी राजसता व देणगीदारांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच नगरपालिका इमारत जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत स्थलांतरित करून सध्याची इमारत मंदिर परिसराच्या विकासासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


महोत्सवाच्या तिसन्या दिवशी भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या ऑल दि बेस्ट या गाजलेल्या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना अक्षरश: खळखळून हसविले. हलक्या फुलक्या कथानकासोबत उत्कृष्टअभिनय नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला. दरम्यान हा महोत्सव सर्व वाशीकर यांचा असून या महोत्सवासाठी अनेकांनी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.


भविष्यातही हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल, अशी ग्वाही राऊत यांनी दिली. दरम्यान, पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला होम मिनिस्टर कार्यक्रम २८ एप्रिल रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वेद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाजप युवानेते अँड. रणवीर राऊत, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, शिवशक्ती

बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. गुलाबराव पाटील, मंदार कुलकर्णी, नगरसेवक विजय राऊत, राजाभाऊ सुरवसे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, डॉ. संजय अंधारे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages