श्रीकांत ढवण यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

श्रीकांत ढवण यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार

 श्रीकांत ढवण यांना राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीकांत ढवण यांना “राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कृषिमंत्री दत्तामामा भरणे, सिनेअभिनेते महेशदादा देवकाते पाटील, ब्रिगेड महाराष्ट्रच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, तसेच सिनेअभिनेत्री भारती जीभकाटे आणि रिया खुरपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात श्रीकांत ढवण यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजासाठी केलेल्या योगदानाचे अभिनंदन केले.

यावेळी श्रीकांत ढवण यांनी हा सन्मान स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त केली. तसेच राहुल कुदनर (संपादक, राष्ट्रीय लोकराज्य न्यूज) आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने सोहळा उत्साहात पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages