१०८ कोटींच्या प्रकल्पाला वेग; अक्कलकोटला आधुनिक रुग्णालयाची भेट” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

१०८ कोटींच्या प्रकल्पाला वेग; अक्कलकोटला आधुनिक रुग्णालयाची भेट”

 १०८ कोटींच्या प्रकल्पाला वेग; अक्कलकोटला आधुनिक रुग्णालयाची भेट”






अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट येथे उभारण्यात येत असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून ही अत्याधुनिक सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पामुळे अक्कलकोटसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विद्यमान ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करत तब्बल १०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतचा हा तालुका, राष्ट्रीय महामार्गांची जोड आणि शेती बाजारपेठेतील हालचाली यामुळे येथे कायम गर्दी असते. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या आणि दर्जेदार आरोग्य सेवांचा अभाव जाणवत होता.

सध्या कार्यरत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला.

नवीन रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशस्त वॉर्ड, तसेच प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे अक्कलकोट आणि परिसरातील नागरिकांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणार आहे.

चौकट : दर्जेदार सुविधांसाठी प्रयत्न

“अक्कलकोटमध्ये आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे,” असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages