साहित्यरत्न कॉ. अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार' वितरण कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

साहित्यरत्न कॉ. अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार' वितरण कार्यक्रमाचे आयोजन

 साहित्यरत्न कॉ. अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार' वितरण कार्यक्रमाचे आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शुक्रवार १ मे ,महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील व कामगार चळवळीतील अग्रणी नेते साहित्यरत्न  कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 'गुणवंत कामगार पुरस्कार ' वितरण कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ,सोलापूर येथे सकाळी 9:30 वाजता करण्यात आले आहे. सोलापूर शहराचे  महापौर  विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास आयुक्त सचिन ओंबासे, भाजपा गटनेते नरेंद्र काळे नगरसेवक समाधान आवळे, श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले, चेतन नरोटे,आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
   कार्यक्रमाचे आयोजक क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले की,थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान शाहिरी ,पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व चळवळीत लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर १मे हा 'जागतिक कामगार दिन' देखील आहे. अण्णाभाऊ स्वतः एक गिरणी  कामगार होते.त्यांनी स्वतःला कामगार चळवळीत झोकून  दिले होते. 'पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, दलित व कामगारांच्या तळहातावर तरली आहे.' असे सांगून त्यांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.१९३८ ते १९४४ पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात, संघर्षात ते सामील होते.१९४४ मध्ये 'लाल बावटा कलापथकाची' स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे  साहित्यातील योगदान, कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग याचे विस्मरण नवीन पिढीला होऊ नये म्हणून दरवर्षी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक मे या दिवशी अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम आणि गुणवंत कामगार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष आहे. संघटित व असंघटित क्षेत्रातील निवडक गुणवंत कामगारांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार २०२६ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ,फेटा व स्मृतिचिन्ह असे राहणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही करत आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages