सोलापूरच्या गारमेंटला ग्लोबल मार्केट मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार - मुख्यमंत्री फडणवीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

सोलापूरच्या गारमेंटला ग्लोबल मार्केट मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार - मुख्यमंत्री फडणवीस

 सोलापूरच्या गारमेंटला ग्लोबल मार्केट मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार - मुख्यमंत्री फडणवीस





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सतत नऊ वर्षे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरवून सोलापूरचे नाव देशभर पोहोचविला त्या सोलापूरच्या युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन ला साता समुद्रापार असलेल्या दुबई येथे गारमेंट प्रदर्शन भरविण्या करिता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ठोस आश्वासन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

सोलापूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या  घवघवीत यशाची कृतज्ञता व्यक्त करण्या साठी हरिभाई शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोशियन ने दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन भरविणे तसेच सोलापूरला एक अत्याधुनिक गारमेंट पार्कची उभारणी करणे तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फतच गणवेश पुरविण्याचे काम स्थानिक पातळीवर व्हावे या तीन प्रमुख मागण्या करिता सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली आणि तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते.

आता मिळालेले हे ठोस आश्वासन केवळ  आमदार सुभाष देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच अशी कर्तज्ञता असोसिएशन ने व्यक्त केली.

सतत नऊ वेळा भरविण्यात आलेल्या देशांतर्गत युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन ला प्रचंड प्रतिसाद मिळाले आहे. युनिफॉर्म गारमेंट चे मार्केटिंग देशाबाहेर होणे गरजेचे असल्याचे मत माननीय आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली होती. 

*केवळ भाजपा शासनाच्या पॉलिसीमुळेच जिल्हा परिषदेच्या शालेय समिती मार्फतच गणवेश पुरवायचे किंवा वितरण करावे या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूरला  मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली.*

यापूर्वी युनिफॉर्म गारमेंट असोसिएशनने सोलापूर सह मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, वाराणसी अशा विविध मेट्रो सिटी मध्ये आपले युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शन यशस्वीरित्या राबविले होते. त्याचेच परिणाम म्हणून गारमेंट असोसिएशनने आ. सुभाष बापू देशमुख यांच्याकडे देशाबाहेर प्रदर्शन भरविण्याची योजना मांडली होती. 

आमदार देशमुख यांनी वारंवार प्रयत्न करून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा विषय मांडला होता.  त्याचेच परिणाम म्हणून की काय आज मुख्यमंत्र्यांनी युनिफॉर्म गारमेंट वितरण तसेच अत्याधुनिक गारमेंट पार्क आणि दुबईतील प्रदर्शन या तिन्ही मागण्या त्यांनी मान्य केले आहेत.

चौकट ;
 मुख्यमंत्र्यांनी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली ती सुरू करण्यात आली आयटी कंपन्यांची घोषणा केली त्याकरिता आत्ता नुकतेच जमिनीचे हस्तांतरण केलेले आहे. सोलापूर आता ग्लोबल मार्केटिंग कडे वळत असल्याने गारमेंट असोशियन ने आता दुबई येथे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरविण्या करिता व रेडीमेड गारमेंट पार्क बनविण्याकरिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.*

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages