जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मान

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय,आपली सेवा आमचे कर्तव्य या उपक्रम या अंतर्गत संभाजीनगर चे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचा मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे हस्ते सन्मान करणेत आला., महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे सचिव अतुल घाटगे यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणेत आला. 
सेवा हक्क अधिनियम ९१ टक्के सेवा कालमर्यादेत देऊन उच्चांक केल्याबद्दल तसेच अधिनियम अंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात यशस्वी राबविल्याबद्दल स्वामी यांचा स्वामी करणेत आला. 
दिलीप स्वामी हे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर या पदावर कार्यरत असताना, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वर्ष २०२५-२६ मध्ये " महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त अर्जापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जाचा विहीत कालावधीत निपटारा केले बद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचा गौरव करणेत येणार आहे.  
या  उपक्रमाद्वारे आपण हा संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श प्रस्तापित केला आहे. यास्तव राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना प्रेरणा मिळण्याचे हेतुने दि.२८.०४.२०२६ रोजी दुपारी ११.०० वा. सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात आयोजित सोहळयात महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे. 
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी दिलीप स्वामी यांना उपस्थित राहणे बाबत लेखी कळविले आहे. 

*सेवा हक्क अभियानात प्रत्येकाचा सहभाग- दिलीप स्वामी*
……………..
छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना या अभियानाची विशेष अंमलबजावणी केली. या मध्ये सर्व महसुल विभागातील कर्मचारी यांचा योगदान आहे. लोकांना चांगल्या सेवा देणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात याची सर्वांनी दखल घेणे आवश्यक आहे. चांगले काम करूनही नैराश्य येते. परंतू या सेवा हक्क अभियाना मुळे शासनाची प्रतिमा देखील उंचावणेस मदत झाली आहे. असेही व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages