११ एप्रिल रोजी सोलापूरात तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बहुजनांच्या साहित्याला एक हक्काचे विचारपीठ निर्माण व्हावे याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड यांच्या वतीने सोलापुरात शनिवार, दि.11 एप्रिल रोजी उपलप मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर ठिकाणी तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा आयोजक ॲड. बी. आर. कलवले, संयोजक पत्रकार भरतकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
शनिवारी सकाळी ८ वाजता चार हुतात्मा पुतळ्यापासून ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत असून टाळ मृदुंगाच्या गजरात ही ग्रंथ दिंडी डॉ. आंबेडकर पुतळा, डफरीन चौक संगमेश्वर महाविद्यालय मार्गे उपलप मंगल कार्यालय येथे या ग्रंथदिंडीची सांगता होणार आहे. यानंतर उपलप मंगल कार्यालयात सकाळी 10.30 वाजता संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनात सुरुवात होईल. या संमेलनाचे उद्घाटन आ. अमित गोरखे यांच्या हस्ते तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, माजी मंत्री बसवराज पाटील, साहित्यिक माधव गादेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी उद्योजक डॉ. कुमार करजगी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ. ऋत्विक जयकर (वैद्यकीय), ह.भ.प. विठ्ठल माने (धार्मिक), उत्तम माने (सामाजिक) यांचा विशेष गौरव होणार आहे. तसेच यावेळी दत्तात्रय इंगळे, डॉ. एस.एन. पठाण, विजयकुमार सोनवणे, प्रिया चौधरी, किशोर जाधव यांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन होणार आहे.
दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ३ या वेळेत 'कर्मवीर भाऊराव पाटील यांची शैक्षणिक दृष्टी व सध्याचे शैक्षणिक धोरण' या विषयावर डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत असून यात प्रा.डॉ. अनिता शिंदे, बीड प्रा.डॉ. जयदथ जाधव, प्रा.डॉ. जयदेवी पवार, प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर हे सहभागी होत आहेत. दुपारी ३ ते ६ या वेळेत कवी दत्तात्रय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाकवी संमेलनाचे आयोजन केले असून या कवी संमेलनात शहर जिल्हा व राज्यातील जवळपास ७० कवी सहभागी होत आहेत. याप्रसंगी नरेंद्र गुंडेली, दस्तगीर जमादार, भगवान चौगुले, राजश्री जाधव, सुरेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सायंकाळी ६ वाजता या संमेलनाचा समारोप होत असून राज्यसभा खा.प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. राम गुंडिले, लेखक विलास सिदगीकर, उषा रवींद्र गायकवाड, माजी आ. बब्रुवान खंदाडे, मनपा गटनेते आनंद चंदनशिवे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उमरगा नगरपरिषदेचे अध्यक्ष किरण गायकवाड, गंगाधर म्हमाणे, उमरगाच्या सभापती ॲड.आकांक्षा चौगुले, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या उपस्थितीत दिगंबर ढेपे, राजेंद्र पाराध्ये (शैक्षणिक), नानासाहेब मोरे, देविदास कसबे, अगंद जाधव (सामाजिक), ॲड. कोमल ढोबळे, ॲड. गोविंद सूर्यवंशी (विधी), नागनाथ गायकवाड, उत्तरेश्वर मठपती, किशोर जाधव (सर्व साहित्यिक), डॉ. सिद्धेश्वर करजखेडे (वैद्यकीय), दत्ता वाघमारे (उद्योग) या विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यभरातील सर्व साहित्यिकांनी या संमेलनास उपस्थिती रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष लक्ष्मण कारले यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस ह.भ.प. विठ्ठल माने, लक्ष्मण कारले ,रमेश लोंढे आदी उपस्थित होते.
.png)
.png)
.png)
No comments:
Post a Comment