माढेश्वरी बँकेचा ‘नो एनपीए’ विक्रम कायम
मानेगाव (कटूसत्य वृत्त):- माढा येथील माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सलग पाचव्या वर्षीही नेट एनपीए शून्य (०) टक्के राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली.
माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने प्रगती साधली असून सध्या माढा मुख्य शाखेसह सोलापूर व पुणे जिल्ह्यात एकूण १० शाखा कार्यरत आहेत. बँकेचे सुमारे ११ हजार सभासद असून एकूण ठेवी २५३ कोटी ८३ लाखांवर पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षभरात ठेवींमध्ये ३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बँकेने १४३ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून भागभांडवल ७ कोटी ७६ लाख इतके आहे. याशिवाय बँकेने ३ कोटींहून अधिक निव्वळ नफा मिळवला असून राखीव व इतर निधी ३० कोटी ९१ लाख इतका आहे. मागील २५ वर्षांपासून बँकेला सातत्याने ‘अ’ दर्जाचे ऑडिट वर्गांकन मिळत आहे.
बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे कर्जवाटप व वसुली व्यवस्थित झाली असून कर्जदारांनी वेळेवर हप्ते भरल्यामुळेच एनपीए शून्यावर राखणे शक्य झाले असल्याचे लुणावत यांनी नमूद केले. बँकेने दरवर्षी सभासदांना लाभांशाचे वाटपही केले आहे.
चौकट :- वेतनात सरासरी ११ टक्के वाढ
बँकेच्या सर्व शाखांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या वेतनात सरासरी ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच मागील एक महिन्याचा फरकही चालू वेतनात अदा करण्यात आल्याची माहिती व्हाईस चेअरमन अशोक लुणावत यांनी दिली.
.png)
No comments:
Post a Comment