लोकमंगल महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2026

लोकमंगल महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

 लोकमंगल महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करिअर याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानासाठी मार्गदर्शन म्हणून श्री अजय कांबळे (अधिकारी, प्रादेशिक ग्रामीण बँक) हे लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बँकिंग क्षेत्र हे भारतात एक अत्यंत सुरक्षित आणि प्रतिष्ठेचे करिअर मानले जाते. यामध्ये सरकारी  आणि खाजगी बँकांमध्ये कृषी अधिकारी, प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक (Clerk), क्रेडिट ऑफिसर, आणि डिजिटल बँकिंग व मार्केटिंग क्षेत्रात मोठी संधी आहे. याबरोबरच त्यांनी बँकिंग क्षेत्रात आवश्यक ऊत्तम संवाद , डिजिटल साक्षरता, गणितीय क्षमता यासारखी कौशल्ये व परीक्षा तयारी यांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages