एनटीपीसी स्पर्धेत आहेरवाडीचा जलवा, विजेतेपदावर शिक्कामोर्तब!” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

एनटीपीसी स्पर्धेत आहेरवाडीचा जलवा, विजेतेपदावर शिक्कामोर्तब!”

 एनटीपीसी स्पर्धेत आहेरवाडीचा जलवा, विजेतेपदावर शिक्कामोर्तब!”




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- NTPC Limited सोलापूरच्या वतीने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत आयोजित ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत आहेरवाडी संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. आहेरवाडी, फताटेवाडी, होटगी स्टेशन आणि तिल्लेहाळ या गावांतील युवकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला.

ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यात क्रीडा भावना विकसित करणे तसेच परस्पर सहकार्य, समन्वय आणि सामाजिक सलोखा वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

स्पर्धेचे उद्घाटन एनटीपीसीचे कार्यकारी संचालक बी. जे. सी. शास्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी क्रीडाचे महत्त्व अधोरेखित करत, “अशा स्पर्धांमुळे युवकांच्या शारीरिक व मानसिक विकासाबरोबरच समाजात एकता आणि बंधुत्वाची भावना दृढ होते,” असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला महाव्यवस्थापक एम. के. बेबी (संचालन व देखभाल), महाव्यवस्थापक सुभाषिस बंदोपाध्याय (देखभाल व अतिरिक्त प्रशासन अधिकारी) यांच्यासह एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील अंतिम सामन्यात फताटेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत १२ षटकांत १०५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आहेरवाडी संघाने दमदार खेळ करत १०६ धावा पूर्ण करून सामना जिंकला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

समारोप सोहळ्यात विजेत्या आहेरवाडी संघासह उपविजेत्या फताटेवाडी संघाचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी एनटीपीसी सोलापूरच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ग्रामीण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा भविष्यातही सातत्याने आयोजित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages